Skip to main content

Honey Bee Farming

मधुमक्षिका पालन

प्रस्तावना

राज्यातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील लोकांना त्यांचे उत्पादनाचे साधन म्हणून एक जोडधंदा उपलब्ध करून देता यावा त्याचबरोबर निसर्गातील वाया जाणा-या संपत्तींचा उपयोग करून घ्यावा, यासाठी १९४६ साली मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मध उद्योगास महाबळेश्वर येथे सुरुवात केली. १९५२ साली एपीकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात सन १९६२ पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापनेपासून ख-या अर्थाने मध उद्योगाच्या कामाला गती मिळाली.
उद्देश

मधमाशापालन उद्योग सुरू करण्यासाठी मधमाशापालनासाठी उपयुक्त वनस्पती व शेतीपिके असलेल्या भागांची पहाणी करून निवड करणे.मध उद्योग सुरू करण्यासाठी निवड केलेल्या लाभार्थीस शास्त्रोक्त मध उद्योगाचे प्रशिक्षण देणे.प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थीस मधमाशापालनाचे टिकाऊ व योग्यमापाचे चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा करणे.बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे.व्यावसायेिक तत्वावर मध्र उद्योगाचे उद्योजक निर्माण करणे.मोठ्या प्रमाणावर वसाहतींची निर्मिती करून मागणीनुसार गरजूंना त्याचा पुरवठा करणे.राज्यातील मधोत्पादन वाढविणे.मधमाशांद्वारे परागीभवन कार्यक्रम राबवून शेतीपिके व फळबागांतील उत्पादन वाढविणे.मध उद्योग करणा-या मधपाळांचा मध व मेण हूमीभावानें खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया करणे व त्याची विक्री हे त्यांच्या मधाला जास्तीतजास्त भाव मिळवून " देण्यासाठीं प्रयत्न करणे.जंगल भागातील मधपाळांकडून सेंद्रिय मधाचे उत्पादन करणे.

मधमाशांच्या जाती

महाराष्ट्रात व भारतात मधमाशांच्या

आम्या मधमाशा,सातेरी किंवा सातपुड़ी मधमाशा,फुलोरी किंवा काटेरी मधमाशा वपोयाच्या मधमाशा अशा चार जाती आहेत.

पाचवी जात युरोप खंडातून आयात केलेली आहे. तिचे नाव एपीस मेलीफेरा आहे. त्यांना युरोपियन किंवा इटालियन मधमाशा असेही म्हणतात.

आग्या मधमाशा

आकाराने इतर सर्व जातींच्या मधमाशांपेक्षा मोठ्या असतात. त्या त्यांचे एकच पोळे उंच झाडाच्या फार्दीला, पाण्याच्या टाकोला, पुलाला, कड्याला जमिनीपासून उंच ठिकाणी बांधतात. पोळे सूर्यप्रकाशात उजेडात बांधतात. त्यामुळे त्यांना मधपेटीत बंद करून ठेवता येत नाही. मध पोळ्याच्या एका कोप-यात साठवितात. त्यामुळे त्यांचा मध्र मधयंत्राच्या सहाय्याने काढता येत नाही. आकाराने मोठ्या व स्वभावाने रागींट असलेल्या या माशा मोठ्या प्रमाणात चावल्यास मनुष्य दगावण्याची शक्यता असते. या मधमाशा खाद्य नसल्यास स्थलांतर करून पोळे सोडून निघून जातात. त्यामुळे आम्या मधमाशाचे पालन केले जात नाही. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचा शुद्ध मध काढता येतो. या मधमाशामुळे शेतीपिकांचे परार्गीकरण होते आणि त्यांच्यापासून मध व मेण मिळते. त्यामुळे त्यांना जाळून त्यांचा नाश करू नयें.

सातेरी किंवा सातपुडी मधमाशा

या मधमाशा आग्या मधमाशा व मेलीफेरा मधमाशापेक्षा आकाराने लहान व फुलोरी व पांयाच्या मधमाशापेक्षा मोठ्या असतात. या मधमाशा मुख्यत्वे पश्चिम घाटात व सातपुडा पर्वतरांगांत दिसून येतात. खादी ग्रामोद्योग मंडळाने महाराष्ट्रात सर्वत्र यांचे स्थलांतर व प्रचार केल्याने त्या सर्वत्र दिसून येत आहेत. या मधमाशा झाडाच्या पोकळ ढोलीत, मुंग्यांच्या वारुळात, मोठ्या दगडांच्या तालींत, उंच कड्याच्या कपारीत ७ ते १u पोळी अंधारात बांधतात. या मधमाशा अंधारात राहूत असल्यानें मधपेटीमध्ये पाळता येतात. या मधपेट्टीपासून १ ते १.५ कि.मी.पर्यंत जाऊन फुलातील मकरंद व पराग घेऊन मधपेटीत आणतात. या वर्षाला सरासरी १0 ते १२ किंलोंपर्यंत मध वाढते .

फुलोरी किंवा काटेरी मधमाशा

या मधमाशा आग्या मधमाशा व मेलीफेरा मधमाशा तसेच सातेरी मधमाशापेक्षा आकाराने लहान, तर पोयाच्या मधमाशांपेक्षा मोठ्या असतात. या सर्वसाधारण सपाट भागात सर्वत्र दिसून येतात. त्या

एकच पोळे झाडाच्या फांदीला, झुडपात, काटेरी कुंपणाला बांधतात. त्या उजेडात पोळे बांधतात म्हणून त्यांना मधपेटीत पाळता येत नाहीत.

या मधमाशांचा मध्र औषधी असतो. तसेच मेण ग्रामीण भागातील महिला कुंकू लावण्यापूर्वी वापरतात.

पोयाच्या मधमाशा

या मधमाशा इतर सर्व जातींच्या मधमाशापेक्षा अकाराने लहान असतात. या इतर मधमाशाप्रमाणे पोळे बांधत नाहीत. या भिंतींत, झाडाच्या ढोलीत अंधारात उंचवटे असलेली घरे बांधतात. त्यामध्ये अंडी, अळी, पराग व मध साठविंतात. मधयंत्राच्या सहाय्यानें मध वेगळा काढता येत नाही. या मधमाशांना नांगी नसते. त्यामुळे त्या चावत नाहीत; परंतु पंख्याच्या व पायाच्या सहाय्याने गुदगुल्या करून स्वतःचे संरक्षण करतात. या मधमाशा काट्यांच्या व गाजराच्या बियाणे निर्मितीमध्ये परागीभवनासाठी फार उपयुक्त आहेत. तसेच या इतर पिकांचेही परागीकरण करतात.

एपीस मेलीफेरा मधमाशा

या मधमाशा आग्यापेक्षा लहान व इतर मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. मेलीफेरा मधमाशा युरोप खंडातून भारतात आयात केलेल्या आहेत. या मधमाशा वर्षाला सरासरी ४0 कि.ग्रॅ. मध उत्पादन देतात. सपाट भागात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत यांचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते. या मधमाशांचा मध निर्यात केला जातो. मधमाशांच्या वसाहती मधपेट्यांतून गृहत्याग करून जात नाहीत. तसेच हाताळण्यास अपेक्षेपेक्षा जास्त मध मिळतो. सातेरी व मेलीफेरा वसाहती शेतीपिके, तेलबिया, फळझाडे व फळभाज्या यांच्या परागीकरणासाठी शेतकरी भाड्याने घेतात. वसाहतीतील घटक राणी माशी, नर माशा, कामकरी माशा व त्यांचा पिलावा या सर्वांना वसाहत असे म्हणतात. एका वसाहतीत वीस ते तीस हजार माशा असतात. एक वसाहत म्हणजे मधमाशांचे एक कुटुंब असते. त्यामध्ये राणी माशी ही प्रमुख माशी आहे.

राणी माशी

राणी माशी ही नर माशा व कामकरी माशांपेक्षा आकाराने मोठी असते. एका वसाहतीत एकच राणी माशी असते. राणी माशीच्या घरात अंडी घातल्यानंतर १६ व्या दिवशी राणीचा जन्म होतो. राणीचा रंग सोनेरी व भुरकट असतो. पोटाचा भाग लांबट गोल व टोकाला निमुळता असतो. राणी जन्माला आल्यानंतर वयाच्या ६ ते १o दिवसांच्या दरम्यान राणीचा नराबरोबर पेटीच्या बाहेर हवेत संयोग होतो. राणीच्या आयुष्यात फक्त एकाच दिवशी नराबरोबर संयोग होतो, पुन्हा होत नाही . राणीच्या पोटात शुक्राणू पिशवी असते. त्यामध्ये शुक्रबीज साठविले जाते. राणी संयोगित झाल्यानंतर २४ तासांनंतर ती अंडी घालण्यास सुरुवात करते. राणी सफल आणि अफल अशा दोन प्रकारची अंडी घालते. सफल अंड्यांपासून राणी व कामकरी माशीचा जन्म होतो, तर अफल अंड्यांपासून नराचा जन्म होतो. राणी माशी खाद्य असेल, तर दररोज ५00 ते १000 अंडी घालते. खाद्य नसेल, तर अंडी घालत नाही. प्रत्येक वसाहतीतील राणीचा वास वेगळा असतो. ती फक्त अंडी घालण्याचे कार्य करते. राणी माशीचे आयुष्य २ त ३ वर्षे इतके आहे.

नर माशा

नर माशीच्या घरात राणी माशीने अफल अंडी घातल्यानंतर २४ दिवसांनी नर जन्माला येतो. नर आकाराने राणीपेक्षा लहान व कामकरीपेक्षा मोठा असतो. त्याचे डोके मोठे व गोलाकार दिसते. नराच्या पोटाचा भाग टोकाला अर्धचंद्राकार व काळसर असतो. नराला नांगी नसल्याने तो दंश करीत नाही.

१४ दिवस किंवा त्याहून जास्त वयाचे नर राणीबरोबर संयोग करतात. राणीबरोबर संयोग करणारा नर जननेंद्रिय तुटल्याने मरण पावतो. वसाहतीतील कोणतेही काम ते करीत नाहीत; मात्र खाद्य मोठ्या प्रमाणात खातात. राणीचा संयोग यशस्वी झालनंतर कामकरी माशीनंतर नर ऐतखाऊ असल्याने व त्यांची पुन्हा आवश्यकता नसल्याने त्यांचे शिरकाण करतात अथवा ते जिवंत असल्यास त्यांचे आयुष्य ६ महिने असते.

कामकरी माशा

कामकरी माशा आकाराने राणी व नरमाशीपेक्षा लहान असतात. कामकरी माशांच्या घरात सफल अंडी घातल्यानंतर २१ दिवसांनी कामकरी माशीचा जन्म होतो. कामकरी माशा नपुंसक मादी माशा असतात. त्यांच्या जननेंद्रियाची वाढ पूर्ण न झाल्याने नराबरोबर संयोग होऊ शकत नाही. त्यामुळे कामकरी माशा सफल अंडी घालू शकत नाहीत. राणीविरहित वसाहतीत अफल अंडी घालतात. कामकरी माशांच्या शरीराची रचना व अवयव कामे करण्यासाठी उपयुक्त असल्याने त्या वसाहतीतील वयोमानाप्रमाणे पुढील कामे करतात. कामकरी माशा जन्माला आल्यानंतर पहिले १ ते ३ दिवस साफसफाई करण्याचे काम करतात. ४ ते ६ दिवस वयाच्या माशा मोठ्या अळ्यांना खाद्य खाऊ घालतात.

७ ते ९ दिवसांच्या माशा लहान अळ्यांना खाद्य खाऊ करतात. जी कामकरी माशी माणसाला चावते, तिची नांगी व विषग्रंथी तुटल्याने ती एका तासानंतर मरण पावते. त्यानंतर कामकरी माशा पराग, मकरंद व पाणी आणण्याचे काम करतात. ते आणण्यासाठी त्या वसाहतीपासून २ ते ३ कि.मी. चारी बाजूस जाऊन परत येतात. त्यांची भाषा असते. त्या गोल नृत्य करून १०० मीटरच्या आतील खाद्य सांगतात. १oo मीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर इंग्रजी आठसारखे नृत्य करून अंतर व दिशा सांगतात. त्या मरेपर्यंत काम करतात. कामाच्या हंगामात त्यांचे आयुष्य ३ महिन्यांपर्यंत असते. काम नसेल तर त्यांचे आयुष्य ६ महिने इतके असते.

मधमाशापालन उद्योगासाठी लागणारे आवश्यक साहित्य

मधपेटी - मधमाशांची वसाहत ठेवण्यासाठी लाकडी मधपेटीचा उपयोग केला जातो.वसाहत - सातेरी वसाहत निसर्गातील पकडून किंवा खरेदी करून उपलब्ध करून घेता येते. तर मेलीफेरा वसाहत खरेदी करावी लागते.मधयंत्र - मधमाशांच्या वसाहतींपासून शुद्ध मध काढण्यासाठी मधयंत्राचा उयोग केला जातो. मधयंत्र स्टेनलेस स्टीलचे असावे.
लोखंडी स्टँड - मधपेटी ठेवण्यासाठी व मुंग्यांपासून तसेच पावसापासून वसाहतींच्या संरक्षणासाठी याचा  उपयोग होतो.धूरयंत्र - वसाहतींची तपासणी करताना मधमाशांनी चावू नये, यासाठी याचा उपयोग होतो.स्वार्मनेट व बीव्हेल - मधमाशाची वसाहत पकडण्यासाठी व तपासणीकरिता उपयोगी आहे.

महाराष्ट्रातील सध्यस्थिती राज्याची भौगोलिक रचना पाहता, मधमाशापालनास राज्यात मोठा वाव आहे. विंदर्भातील मोठ्या प्रमाणात असलेले जंगल, मराठवाड्यातील तैलबियांचे वाढलेले क्षेत्र तर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि मेळघाटमधील सातपुडा पर्वत, राज्यातील उर्वरित भागातील वाढलेल्या फळबागा मध उद्योगास पूक आहेत.

पुढीलप्रमाणे मध उद्योगाचे कामकाज सुरू आहे. अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणा-या लोकांना मधमाशापालनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. मधपाळांच्या मधाची विक्री मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टीने संचालनालयामार्फत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. राज्यातील संपूर्ण भागाचा अभ्यास करून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने मधमाशापालन हा उद्योग भविंष्यात पर्याय ठरू शकतो. यासाठी मधमाशापालनाबाबत जाणीवजागृती करण्यात येत आहे. सेंद्रिय मधला मंडळाने मधपाळास रु. ४00/- प्रति केिलोग्रॅम एवढा खरेदीदर दिला आहे. तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश देवकर यांच्या मार्गदर्शनाखालों प्रभावों कामकाज करण्यात येत आहे. आग्या मधमाशांचे राज्यातील मधाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. पालन करणा-या मधमाशांपेक्षा आग्या मधमाशांपासून मिळणारा मध उत्कृष्ट असल्याने त्याबाबत आग्या मधमाशांचा शास्त्रोक्त पद्धतीने काढलेला मधही यापुढे संचालनालयामार्फत खरेदी केला जाणार आहे.

अनेकदा उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध नसल्याने चांगला दर्जा व गुणवत्ता असूनदेखील उत्पादित मालाचा उठाव होत नाही; मात्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयाने मध उत्पादकांना मधखरेदींची हृमी दिली असल्याने मधमाशापालन ह्या व्यवसाय कधीही तोट्वात जात नाही. मधमाशापालन करणारी व्यक्ती निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करते; शिवाय शेतक-यांच्या पीक उत्पादनातही वाढ करते आणि अमृतासमान मध उत्पादित होतो.
मधमाश्यापालन केल्याने मधपाळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन समाजिक सहजीवनाची जाणीवही मध उद्योगमुळे त्याच्या मनात निर्माण होते. राज्यातील ओलिताखाली असलेली शेती व तेलबियांचे व फळांचे उत्पादन पाहता मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे उत्पादन वाढण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय जोडधंदे निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील व जंगल भागातील आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही.

वराहपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, रेशीम उत्पादन या सर्व पूरक व्यवसायांबरोबरच मधमाशापालन हा शेती व्यवसायाला उत्तम जोडधंदा ठरू शकतो. अत्यल्प भांडवल, जागा, शेड, यंत्रे, मजूर, कचामाल या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसतानादेखील केवळ लाकडी मधपेट्या व मधयंत्रे यांवरच हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. मधमाशांच्या पेट्या कोणत्याही ठिकाणी ठेवता येतात. निसर्गात वाया जाणारा फुलातील मकरंद व पराग मधमाशा गोळा करतात. त्यावरच मधपाळांना लाखो रुपये त्या कमवून देतात. अमेरिकन शेती शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, मधमाशामुळे परागीभवन होऊन मिळालेल्या वाढीव पिकांचे उत्पन्न हे मधमाशांनी गोळा केलेल्या मधाच्या किमतीपेक्षा १५ पट अधिक असते. महात्मा गांधींनी मधमाशापालनास ग्रामोद्योगातील सर्वोत्कृष्ट उद्योग म्हणून संबोधले आहे. या उद्योगातून भविष्यात मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते.

राज्यात मध उद्योगाला असणारा वाव

सातेरी मधमाशापालन

वर्षभर सदाहरित असणा-या जंगलभागात मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाशापालन करायास वाव आहे. सध्या हजारा मधपाळ शास्त्रांक्त पद्धतीने मधमाशापालन करीत आहेत. सातेरी मधमाशा या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच या जंगलातील पिसा, हिरडा, गेळा, जांभूळ, आखरा, खरखर, कार्वी, व्हायटी, बुरबी, पांगळ या सर्व वनस्पतींपासून मिळणारा मध औषधीमूल्य असणारा आहे. या मधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हजारो मधपेट्या ठेवून लाखो लोकांना रोजगारांची संधी उपलब्ध होत आहे.

मेलीफेरा मधमाशा

राज्यातील कोणत्याही भागात मेलीफेरा मधमाशापालन करता येते. विशेषत: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मेलीफेरा मधमाशापालन करण्यास मोठा वाव व इतर पिकांच्या परागीभवनासाठी मेलीफेरा मधमाशांचा फार उपयोग होतो. मेलीफेरा मधमाशांचे सतत स्थलांतर करीत राहिल्यास त्यांच्यापासून वार्षिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांना या उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी आहे.

आग्या मधमाशा

विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आग्या मधमाशा मोठ्या प्रमाणावर व गोरगरीब लोक जंगलभागातून आग्या मधमाशांचा मध गोळा करतात. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देऊन त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य पुरविल्यास शुद्ध प्रतीचा आग्या मधमाशांचा मध संकलित करता येतो. याकरिता वेगवेगळ्या सेवाभावी संस्था तेथे मध संकलनाचे कार्य करीत आहेत.
for Project report Contact us @ Kusum Creations Nanded, Contact No.9970337378, 9860204481

Comments

Popular posts from this blog

Agriculture Institutes In Maharashtra

कृषिविषयक संस्था महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संश...

Onion storage 25 MT

कांदा चाळ  (क्षमता 25 टन) पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण केल्यास वजन घटते, कोंब फुटतात, काही वेळा कांदे सडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. होणारे नुकसान लक्षात घेऊन येत...

Drumstick - शेवगा

शेवगा : शास्त्रीय नाव:  Moringa oleifera ,  मॉरिंगा ऑलिफेरा  ;  इंग्लिश :   Drumstick ,  ड्रमस्टिक  ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या  मॉरिंगा  प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती आहे.  उष्ण कटि...