शेततळे आणि मत्स्यसंवर्धन
शेती सारखीच तलावाची मशागत करून मत्स्योत्पादन वाढविणे म्हणजे मत्स्यशेती होय. मत्स्यबीजाची निवड करून वर्षभर पुरेसे पाणी आणि आवश्यकतेनुसार खत व खाद्य पुरवठा ही मत्स्यशेतीतील मशागतींची कामे आहेत. तलावातील पाण्यात काही प्रमाणात मासळीचे अन्न निसर्गतः उपलब्ध असते. त्यावर उपजीवेिका करुन मर्यादित प्रमाणात मासळींची वाढ होते. मात्र, ठरावीक जातीच्या मासळीचे कमीतकमी जागेत, खत व खाद्याचा वापर करून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी सुनियोजित पद्धतीने सधन मत्स्यशेतीचे तंत्र अवलंबेिणे फायदेशीर ठरते. साधारणपणे मत्स्यशेती सरासरी २0 हेक्टर जलक्षेत्रापेक्षा कमी असणा-या लहान सिंचन, पाझर/गाव तलाव, शेत.तळयात करणे इष्ट राहते. याशिवाय पाणथळ जागा, चिंबड व त्यासारख्या जमिनीत मुद्दामहून मत्स्यतळे बांधूनही मत्स्यशेती करता येते. राज्य व स्थानिक क्षेत्रातील तलाव प्राधान्याने स्थानेिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना ठेक्यावर मिळतात.
जेवढ़ी तलावाची आराजी जास्त तेवढ़ी प्रतिहेक्टरी मत्स्योत्पादनाचा दर कमी येतो. त्यामुळे मोठ्या तलावासाठी प्रतिहेक्टरी खचसि मयांदा ठेवावीं लागतें. पाणी भरपूर पण शेतीसाठी निरुपयोगी झालेल्या खोलगट, पडीक पाणथळ जागेत, चिबड जमिनीत खोदलेले तळे मत्स्यशेतीसाठी वापरता येते. वर्षभर सुमारे २ मीटर पाण्याची पातळी राहू शकेल एवढ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याची व्यवस्था असावी.
जागेची उपयुक्तता, पाण्याची पातळी राहू शकेल. एवढ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याची व्यवस्था असावी. जागेची उपयुक्तता, पाण्याची उपलब्धता, जमिनीची रचना, मातीचा प्रकार, पाणी टिकविण्याची क्षमता, पुरापासून धोका, आवागमनाची सोय, खोदकामाचे स्वरुप इत्यादी बाबतची तपासणी करून मत्स्यतळे खोदावे. सर्वसाधारण परिस्थितीत सरासरी ४४×४४×५ मीटर आकाराच्या तळ्यासंदर्भातील आधुनेिक तंत्राची माहिती येथे देत आहोत. आपल्याला मत्स्यशेतीमध्ये भारतीय प्रमुख कार्प माशासोबतच गवत्या, चंदे-या व परदेशी सायप्रेिनस माशाबाबत माहिती आहे. आजपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या या माशांची शेती आपण केली व करीत आहोत. मत्स्यशेतीमध्ये योग्य मासोळीची निवड करणे, ही अतिशय महत्वाची बाब आहे.आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा साठा, कालावधी, आकारमान व जमिनीची प्रत या सर्व बाबींचा विचार करूनच आपण मस्त्यशेतीकरिता माशांची नेिवड करतो. भारतात माशांच्या २००० पेक्षा अधिक जाती आढळतात. त्यामध्ये सागरीं आणेि गोड्य़ा पाण्यातील माशांचा समावेश आहे. गोड्या पाण्यात भारतीय प्रमुख कार्प मासोळीच्या जातीसोबत इतर प्रजातीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्याकरीता गोड्या पाण्यात जलद वाढणारी एक विशिष्ट जात म्हणजे पंगॅसियस सुची (पंगस) व परदेशी जात म्हणजे सायप्रेिनस (कॉमन कार्प) ही आहे.
आपल्या देशात पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यात पंगस मासोळीचे संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा फायदा मत्स्य उत्पादकांना होत आहे. पंगस मासोळीचे वैशिष्ट्य़ म्हणजे मासोळी कापल्यानंतर तिचे मांस लालसर रंगाचे असते. पंगस मासोळीत काट्याचे प्रमाण कमी असल्यामुळे ग्राहकांना ही मासोळी आवडते. मात्र कट्ला, रोहू माशांच्या तुलनेत पंगस कमी चवदार असली तरी आहारात प्रथिने म्हणून यांच्या मूल्यात कोणतीही कमी नाही.
पंगस मासा वरच्या थरात राहणारा असून सायप्रेिनस हा मासा खालच्या थरात राहणारा असल्यामुळे तलावातील खाद्यांचा पुरेपूर वापर या माशांद्वारे केला जातो. सायप्रिनस माशाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माशाच्या खवल्यावर विविध रंग दिसतात. या माशांचे शरीर रुंद असते. तोंड आखूड असून वरच्या व खालच्या जबड्यांवर प्रत्येकी दोन आखूड व मांसल मिश्या असतात. ह्या मासा ६ ते ८ महिन्यांच्या कालावधीत प्रजननक्षम होऊन वर्षातून दोन वेळेस प्रजनन करतो. एका वर्षात या माशाची वाढ एक ते दीड़ क्लिोपर्यत होते.
शेतातळ्यातील मत्स्यसंवर्धन
शेततळ्यात मत्स्यशेती करावयाचे ठरविल्यास पावसाळ्यापूर्वी तळ्यात ३o किलो कळीचा चुना पसरावा. तलावात ताजे पाणी भरून घ्यावे. ३00 किलो शेणखत व ५ किलो सुपर फॉस्फेट मिसळून ते तलावभर पाण्यात पसरावे. ही व्यक्स्था मत्स्यबीज सोडण्यापूर्वी एक आठवडा आधी करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला निकटच्या शासकीय मत्स्यबीज केंद्रातून पंगस व सायप्रिनस जातीची मत्स्यबोटुकली खरेदी करून तलावात सोडावीत. नमूद्ध केलेल्या मात्रेत प्रत्येक महिन्यात रासायनिक व सेंद्रिय खतांची मात्रा सह्या महिन्यांपर्यंत वापरून त्यापुढील कालावधीत आवश्यकतेनुसार खताचे प्रमाण कमी केले तरी चालेल. पाण्याचा रंग, पारदर्शकता. बाहेरुन घेण्यात येणाया पाण्याचे प्रमाण, तयार होणारे प्लवंग, सूक्ष्म प्राणी, वनस्पती, कोड व मासळीची वाढ यानुसार खतांचा वापर कमी अधिक करावा लागतो. पंगस जातींच्या मासळीच्या अधिक वाढ़ीसाठी खातासोबत मोठ्या प्रमाणात खाद्याचाही वापर करणे आवश्यक आहे. या माशांकरिता विशिष्ट प्रकारचे तरंगणारे खाद्य आंध्रप्रदेशमध्ये वेिवेिध मत्स्यखाद्य निर्मिती मेिलद्वारे तयार केले जाते. तसेच कृषि विज्ञान
केंद्रामध्ये पॅलेटेड मत्स्यखाद्य उपलब्ध झालेले आहे. या खाद्याचा वापर मासळीचे खाद्य म्हणून करता येतो. पुढील तक्त्यात नमूद्ध केलेल्या प्रमाणात खाद्याचा वापर करावा. योग्य प्रमाणात खते व पाण्याची पातळी राखता आली तर साधारणतः ८ ते १० महिन्यात मासळींची वाढ एक किंलोपर्यंत होते.
मासळीपासून मिळणारे उत्पन्न
अ) एकूण मासळीचे उत्पादन : ५,०००,किलो
ब) मासळी विक्रीपासून उत्पन्न :
(मासेमारांची मजुरी वगळून) रु.६०/- प्रती किलो प्रमाणे: रु.३०००००
क) येणारा एकूण खर्च : रु. १,५०,०००
ड) खर्च वजा जाता मिळणारे निव्वळ उत्पन्न : रु. १,५०,०००,
निवड केलेल्या मासळीच्या जाती, तलावाची उत्पादकता, मासेमारीची पद्धत, संवर्धनावर केलेला खर्च, व्यवस्थापन यंत्र यानुसार तलावाची मत्स्योत्पादन क्षमता कमीअधिक होऊ शकते. सदरहू माहिती सर्वसाधारण परिस्थितीत मत्स्यशेती करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची असून विशिष्ट तलाव व प्रकल्पाच्या बाबतीत जसे शेततळे योजना करीता आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि मत्स्यसंवर्धक योजना राबविन्या करीता जिल्ह्या मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
मे.कुसूम क्रियेशन्स नांदेड # 9970337378, 9860204481
Comments
Post a Comment