सामूहिक शेततळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ मध्ये विभागाच्या जाहिरातीनुसार २००० घनमीटर व ५००० घनमीटर करीता शेतकरी बांधवानी अर्ज करणे अपेक्षित आहे. योजनेची उद्दिष्टे पाण्याचे स्रोत निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये आणि पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या तलावास योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण करुन सामुहिक शेततळे करावे.... सामूहिक तळ्याचे प्रकार 1) मॉडेल क्र. 1 ः 2 मी. खोदकाम व 3 मी. बांधाची उंची (Half Dugout) 2) मॉडेल क्र. 2 ः पूर्णपणे खोदकाम करून करावयाचे शेततळे (Fully Dugout) 3) मॉडेल क्र. 3 ः बोडी टाईप सामूहिक शेततळे (Bodi Type) सामूहिक शेततळ्यातील पाण्याचा उपयोग लाभार्थींनी फळपिकांच्या सिंचनाकरिता करणे अपेक्षित आहे. लाभार्थी निवडीचे निकष सामूहिक शेततळ्याचा लाभ लहान शेतकरी, आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्याने देणे अपेक्षित आहे.योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (8 ट...
Contact # Smt. S.D.Bande (Director) +919970337378 , Mr.Shantaram Tobare #+919860204481