हळद शिजवणी तंत्र अ) सुधारित सच्छिद्र ड्रम - या पद्धतीमध्ये पत्र्याच्या ड्रमपासून 45 सें. मी. उंचीचे व 60 सें. मी. व्यासाचे चार ते पाच सच्छिद्र ड्रम 150 सें. मी. व्यासाच्या मोठ्या काहिलीमध्ये कच्ची हळद भरून ठेवतात.मोठ्या काहिलीमध्ये पाणी ओतून पाण्याची पातळी ड्रमच्या उंचीच्या वर पाच ते सहा सें. मी. इतकी ठेवली जाते, ड्रम गोणपाटाने झाकले जातात. या पद्धतीमध्ये हळद फक्त 24 ते 30 मिनिटांत चांगली शिजते.प्रत्येक वेळी काहिलीतील पाणी सोडण्याची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे एक एकरची हळद दोन दिवसांत शिजून तयार होते.हळद शिजताना हळकुंडावरील माती काहिलीत जमा होते, त्यामुळे मातीविरहित स्वच्छ हळद मिळते. ब) आयताकृती कुकर - ही पद्धत तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये 0.5 मी. x 0.7 मी. x 0.5 मी. आकाराचे सच्छिद्र ट्रे कच्च्या हळदीने पूर्णपणे भरून पाणी भरलेल्या 1.2 मी. x 0.9 मी. x 0.75 मी. आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवावेत.या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये 3/4 भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळद शिजते, त्यामुळे हळद एकसारखी शिजली जाते. त्या...
Contact # Smt. S.D.Bande (Director) +919970337378 , Mr.Shantaram Tobare #+919860204481