Skip to main content

Seed Welth Scheme

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची अनुदान, बीजभांडवल योजना

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती आपण घेऊया...

मातंग व तत्सम 12 पोट जातीतील म्हणजेच मांग, मातंग, मिनी मादगी, मादीग, दान खणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या पोट जातीतील बांधवाना अर्ज करता येतील.

योजनेचे स्वरुप

महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीज भांडवल योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 4.72 कोटींच्या उद्दिष्टाची तरतूद आहे. यात अनुदान योजनेंतर्गत 2 कोटीची तरतूद आहे. त्यात 2000 प्रकरणे केली जातील. बीजभांडवल योजनेंतर्गत 330 लाभार्थ्यांसाठी 2.39 कोटींचे उद्दिष्ट आहे. यात नवीन 330 प्रकरणे केली जातील. दोन्ही योजनांची बॅंकनिहाय उद्दिष्ट जिल्ह्याच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्‍या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्जफेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते 7 लाखापर्यंत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरित कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह ) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थ्यास एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेवून जिल्हा कार्यालयातच जमा करणे आवश्यक आहे.

संपर्क कार्यालयाचे नाव
प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक

Comments

Popular posts from this blog

Agriculture Institutes In Maharashtra

कृषिविषयक संस्था महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संश...

Onion storage 25 MT

कांदा चाळ  (क्षमता 25 टन) पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण केल्यास वजन घटते, कोंब फुटतात, काही वेळा कांदे सडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. होणारे नुकसान लक्षात घेऊन येत...

Drumstick - शेवगा

शेवगा : शास्त्रीय नाव:  Moringa oleifera ,  मॉरिंगा ऑलिफेरा  ;  इंग्लिश :   Drumstick ,  ड्रमस्टिक  ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या  मॉरिंगा  प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती आहे.  उष्ण कटि...