Skip to main content

Honey Production

मधमाशी पालन

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग राबविला जातो. मधमाशा पालन हा उद्योग शेतीपुरक व्यवसाय असून व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या शेतक-यास जागा, इमारत, वीज, पाणी यासाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञ व लहानापासून थोरापर्यन्त सर्वांना हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे इतर कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा न करणारा हा एकमेव उद्योग आहे.

मधमाशा मध तयार करतात. मध हे एक अत्यंत शक्तीदायक व पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशा मेण देतात हे सौदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाशा पासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम) पराग (पोलन) रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमुल्य आहे. परागी भवनाव्दारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जनत करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जमिनीची होणारी धुप आणि काही ठिकाणी शेतीत पाण्याचा अतिरिक्त वापर या गोष्टीमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि बी-बियाणे, खताच्या वाढत्या किंमती, रोजमजूरी, वाढते दर या सा-या खर्चामुळे शेती उत्पादन आणि होणारा खर्च याचे व्यस्त होत चाललेले प्रमाण या दृष्टीने मधमाशा पालन हा उद्योग कमी खर्चात, शेतीपुरक व्यवसाय ज्यातुन शेती उत्पादन वाढ या दृष्टीने उपयुक्त उद्योग म्हणून मधमाशा पालन उद्योगाकडे पहावे लागेल.

या उद्योगाचे फायदे मिळावेत या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेतून मधपाळासाठी फायदे मिळवून देण्यात येणार आहेत. या संदर्भात शेतक-यांनी त्याचे शेतीशी जोडधंदा म्हणून उद्योग करावयाचे ठरविल्यास त्यास मधपाळाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वर येथे दिले जाते. त्यानंतर त्यास मध उद्योगासाठी आवश्यक असलेली साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य रु 42700/- पुरविण्यात येते. यात प्रशिक्षण विनामूल्य तसेच साहित्य खरेदीवर 10,000/- पर्यन्तचे अनुदान पश्चिमघाट विकास योजना/ जिल्हा वार्षिक योजना यांचे माध्यमातून दिले जाते. शिवाय शेतक-यास मधासाठी हमी भाव रु. 120/- प्रति किलो निर्धा?रीत केला असून मंडळाकडून मध खरेदी केला जातो.

तेव्हा ज्या शेतक-यांना मधमाशा पालन उद्योग सुरु करावयाचा आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय,
यांचेकडे अथवा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा

Comments

Popular posts from this blog

Agriculture Institutes In Maharashtra

कृषिविषयक संस्था महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संश...

Onion storage 25 MT

कांदा चाळ  (क्षमता 25 टन) पारंपरिक पद्धतीने कांद्याची साठवण केल्यास वजन घटते, कोंब फुटतात, काही वेळा कांदे सडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. होणारे नुकसान लक्षात घेऊन येत...

Drumstick - शेवगा

शेवगा : शास्त्रीय नाव:  Moringa oleifera ,  मॉरिंगा ऑलिफेरा  ;  इंग्लिश :   Drumstick ,  ड्रमस्टिक  ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या  मॉरिंगा  प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती आहे.  उष्ण कटि...